तोलू नको देवा आता माझे गुण दोष
तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष
तूच माझा अंधार, तूच रे प्रकाश ||
मूकपणा तूची देवा , तूच माझे बोल
बोलसी तू मुखी माझ्या , विठ्ठल विठ्ठल ।। १ ।।
कधी देसी गर्व मना , कधी करीसि दीन
मज लागी चरणी तुझ्या , होऊ दे विलीन ।।२।।
सुख दु:ख भाव एक, एक घृणा मोह
तुडुंबला भक्तिभाव, आनंदाचा डोह ।।३।
गीत-संगीत : अरुण सराफ
गायक : रवींद्र साठे
अल्बम : हृदयी रहा रे दयाघना
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY