मंदशा वाऱ्याप्रमाणे वावरावे तू जरा
शुभ्र निशिगंधाप्रमाणे दरवळावे तू जरा
तुजसवे जवळीक करण्या बघ हवा सरसावली
रेशमी काळ्या बटांना आवरावे तू जरा
... रामप्रहरी स्वप्न बघणे शौक आहे पाळला
जाणुनी माझे इरादे बावरावे तू जरा
श्वास रोखुन चालता पण लागते चाहुल तुझी
पैंजणाच्या वाजण्याला थांबवावे तू जरा
रात्र काळोखी पसरली चालता घे काळजी
वाट दिसण्या, काजव्यांना बाळगावे तू जरा
गीत : निशिकांत देशपांडे
संगीत : अरुण सराफ
संगीत संयोजक : संदीप कुमरौथ
गायक : राजन शेगुंशी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY