और माझ्या शायरीचा बाज आहे!
मुरडुनी ते नाक म्हणती माज आहे!!
वाटले आश्चर्य मज अजिबात नाही....
काय ते लिहिणार मज अंदाज आहे!
शेर म्हणजे कल्पनेची ना भरारी....
शेर माझ्या आतला आवाज आहे!
कुटिलता डोकावते कोठे न कोठे....
बोलणे वरुनी जरी निर्व्याज आहे!
नागमोडी वाट प्रामाणीक वाटे....
सरळ रस्ता मात्र धोकेबाज आहे!
चेह-याने फक्त दिसतो संत-सज्जन....
वागणे पण फार कावेबाज आहे!
राग कोणाचाच मजला येत नाही....
मीच माझ्यावर अता नाराज आहे!
कंबरेचे तू भले गुंडाळ डोई.....
पाहणा-याला परंतू लाज आहे!
लगडले सौंदर्य ते आपादमस्तक....
ती जणू आभूषणांचा साज आहे!
लोक वाजवतात आता रोज मजला...
मी जगाचा जाहलो पख्वाज आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY