Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

बादशाही ऐट, जैसे खूप मालामाल होते!

 

 

बादशाही ऐट, जैसे खूप मालामाल होते!
ते गझलक्षेत्रातले निव्वळ भुकेकंगाल होते!!

 

श्रीमुखामध्ये कुणी भडकावली त्यांच्या कळेना....
हाय, त्यांचे गाल झाले काय लालीलाल होते!

 

'जमिन' सोन्याची परंतू हात कसणारे करंटे....
पीक शेरांचेच त्यांच्या केवढे बदचाल होते!

 

ती न श्रीमंती, तिची केवळ दिखाऊ झूल होती....
खानदानी अन् हडाचे लोक ते कंगाल होते!

 

अंगठे उठवून ते देती प्रशस्तीपत्रकेही....
स्वैर, स्वच्छंदी म्हणवती पण, खरे चौचाल होते!

 

ते कितीही आव आणू देत वरुनी सभ्यतेचा.....
सूज दारूचीच होती, गोबरे ते गाल होते!

 

नाव कवितेचे, उखळ करतात त्यांचे पांढरे ते....
काव्य-गझलांचे महोत्सव चालले दरसाल होते!

 

पाहिले जाऊन मी संमेलनामध्ये विदेशी.....
लोकही खोटेच अन् खोटारडे अहवाल होते!

 

धार तलवारीस नाही, मनगटाला जोर नाही....
झेलताना वार बघती कोण त्यांची ढाल होते!

 

केवढा अभिमान त्यांना वांझ त्यांच्या लेखणीचा.....
सूर नाही, ताल नाही, ते असे बेताल होते!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ