हाच माझा दोष, मी सोशीक होतो!
एवढे जाता वजा, मी ठीक होतो!!
सोसली नाही अपूर्वाईच माझी....
ते म्हणाले मी त-हेवाईक होतो!
केवढी किरकोळ अन् फाजील दृष्टी....
कातला गेलो किती बारीक होतो!
झेपली घनता न शेरांचीच माझ्या.....
वाटलो धेंडांस पाल्हाळीक होतो!
शारदे, भरलीस माझी तूच झोळी....
दिव्य शब्दांची तुझ्या मी भीक होतो!
मी न कुटले टाळ, नव्हती माळ कंठी....
मी विठूचा लाडका भावीक होतो!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY