प्रेरणा: आदरणीय गझलकार नीलेश कवडे यांची!
*********************************************************
खूप सांभाळून खेळा, प्रेम साधा खेळ नाही!
जीव ओवाळून खेळा, प्रेम साधा खेळ नाही!!
राखरांगोळी कुणाला लागते व्हावे कदाचित!
जीवही जाळून खेळा, प्रेम साधा खेळ नाही!!
धुंद व्हा प्रेमामधे पण, भानही ठेवा जगाचे......
पथ्य हे पाळून खेळा, प्रेम साधा खेळ नाही!
जोश तारुण्यात असतो....होशही कायम असू द्या!
तोल सांभाळून खेळा, प्रेम साधा खेळ नाही!!
वय न येते आड, ना सद्य:स्थितीही आड येते!
काळ-स्थळ कवळून खेळा, प्रेम साधा खेळ नाही!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY