कोणतेही पहा इथे नाते!
जात कोठे मनातुनी जाते?
ओळ येते कुठून या ओठी?
ना कळे कोण अंतरी गाते!
पावसाची मिजास ही खोटी!
घर उन्हानेच चिंब हे न्हाते!!
आत डोकावुनी पहा थोडे....
मन स्वत:चे स्वत:स का खाते?
वरकमाई जिथे बरी होते.....
तेच त्यांना हवे म्हणे खाते!
दान निरपेक्ष का कुणी देते?
राहिले रे कुठे असे दाते?
तूच जन्मास घातले मजला!
थोर उपकार हे तुझे माते!!
धार माझी नका कमी समजू....
एक गवती दिसे जरी पाते!
पाहताना तुला असे होते.....
लोचनांचे लवे न हे पाते!
काय उपयोग सांग योध्यांचा?
बाण नाहीत ते असे भाते!
नाव माझे तुझ्या सवे येते!
काय माझे-तुझे असे नाते?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY