मज सीलबंद केले जैसा कुणी लिफाफा!
कळलेच पण जगाला मी एक सोनचाफा!!
बस्तान तोतयांनी बघ, केवढे बसवले.....
पिटण्यास फक्त टाळ्या असतोच सज्ज ताफा!
का लागते अचानक ही ओहटी समुद्रा?
मी सोडतो समुद्री माझा जसा तराफा!
त्यांचा मला समजतो कावा अरे, सराफी....
माझ्याच वळचणीला लागून तो सराफा!
उंचावतात माना मजलाच खायला ते......
त्यांना बघून वाटे बघ, लाज त्या जिराफा!
गप्पिष्ठ लोक, त्यांच्या ऐकू किती बढाया?
लावून तिखट-मीठा ते मारतात लाफा!
प्रत्येक शेर माझा फुलतो मळ्याप्रमाणे!
माझा हरेक मिसरा गझलेमधील वाफा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY