मरणाचाही उत्सव झाला जर असता तर......
नाचनाचले असते माझे हेच कलेवर!
उत्साहातच जगलो.....उत्साहातच मेलो!
उत्साहातच निरोप द्या मज या सरणावर!!
नसेल मी पण, असेल माझी इथे शायरी!
अलगद मी येईन जगा, तुझिया अधरावर!
चिता चंदनी रचा, फुलांची दुशाल पसरा......
सुगंध घेऊन गंधवेड्यास जायचे वर!
अखेरचे मोजकेच उरले श्वास खरोखर!
प्राण जायची घटिका आली, ये तू सत्वर!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY