Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

मी काय भास होतो?

 

मी काय भास होतो?
मी आसपास होतो!

 

नाही तुला कळाले....
मी एक श्वास होतो!

 

ना ‘हो’ म्हणत न ‘नाही’.....
त्याचाच त्रास होतो!

 

माझ्यामुळेच त्यांचा...
‘टाईमपास’ होतो!

 

तू रेटतेस मजला....
तेव्हाच पास होतो!

 

आली मुले घरी की,
स्वयपाक खास होतो!

 

मन लागते न हाती...
निष्फळ प्रयास होतो!

 

तडजोड शीक थोडी...
सुखकर प्रवास होतो!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ