नावही माझे कुणाला स्मरत नाही!
मी म्हणे धड जगत नाही, मरत नाही!!
पोट इतक्यातच कसे भरले कळेना....
तुंबड्या कोणीच आता भरत नाही!
कुरण माझे वाचले, आश्चर्य नाही.....
हा असा कडबा, कुणी जो चरत नाही!
भिंगरी पायास कोणी बांधली ही?
पाय माझा का कुठेही ठरत नाही!
थोरवी, मोठेपणा नसतो फुकाचा....
घोषणांनी थोर कोणी ठरत नाही!
भट गझलसम्राट होते, बाप होते....
हात सूर्याचा कुणीही धरत नाही!
लाटणे माझी मन:शांती न सोपे....
जे मला नाही पटत, ते करत नाही!
माणसे पाषाण हृदयाची कशी ही....
का कुणासाठी कुणीही झरत नाही?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY