मतल्याची प्रेरणा नीलेश कवडे यांची
*********************************************************
निवडणूकीचिया नेते तयारीला.....
निघाले की, म्हणावे ते शिकारीला?
मतांसाठीच ते करतात लाचारी........
म्हणावे काय या त्यांच्या हुशारीला?
उफाळोनी उमाळा, कळवळा आला......
पहा त्यांच्या दिलाशांच्या कट्यारीला!
उभे आयुष्य कर्जाऊच हे माझे.......
न कुठलीही उरे सीमा उधारीला!
पहा...महिलादिनाला केवढी इज्जत!
किती देतात ते सन्मान नारीला!!
विषाची झिंग ही मुलुखाहुनी न्यारी!
न कुठली योग्य उपमा या खुमारीला!!
जरी तो विठ्ठलाला एरव्ही विसरे......
न चुकता लावतो वर्णीच वारीला!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY