निवडून हिकमतीने आला, वजीर झाला!
तो कालचा दरिद्री, झटकन अमीर झाला!!
ती दूर देशसेवा, त्या दूर घोषणाही.....
खाते मिळेल कुठले, जो तो अधीर झाला!
आजार फार दुर्धर झाला, मला समजले....
पण, हे कळावयाला भलता उशीर झाला!
मी कोण आणि आलो कोठून, हे समजले....
आसक्त जीव सुद्धा माझा फकीर झाला!
माझी असीम भक्ती पाहून देव सुद्धा...
भेटावयास आला, माझे शरीर झाला!
दोहे जगायची मी सुरुवात काय केली.....
प्रत्येक श्वास माझा तेव्हा कबीर झाला!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY