पोचायचीच खोटी, चकवे तयार होते!
गावात विठ्ठलाच्या बडवे तयार होते!!
घडवून राज्यक्रांती राजाधिराज झाला....
त्याचे लगेच लहरी फतवे तयार होते!
म्हणुनी छचोर चाळे फोफावलेत त्यांचे....
डोलावण्यास माना नटवे तयार होते!
मी थोपवून धरले माझे उधाण, कारण....
फैलावण्या कधीचे बकवे तयार होते!
मज तोंडपाठ होते सारे तिचे बहाणे....
मीही तयार होतो, रुसवे तयार होते!
गझलेत काय होते? झुरळे पिसाळली का?
तुटुनी पडावयाला बिचवे तयार होते!
घनदाट काननाची झालीच भेट नाही....
जाळावयास त्याला वणवे तयार होते!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY