पुन्हा काळीज माझे फाटले!
पुन्हा मन एकदा केकाटले!!
किती निगुती तुझ्या पिसण्यामधे....
न मी पत्ते तसे पण, काटले!
कितीदा मीच मजला शासले....
कितीदा शीर माझे छाटले!
कुठे स्वादिष्ट झाली जिंदगी?
किती मज वाटले नि घाटले!
कुठे लक्षात माझ्या राहते?
कुणी मजला कितीदा लाटले!
पहातो आज मी मेल्यावरी.....
कुठे वाईट कोणा वाटले?
रुचीपालट हवा त्यांना म्हणे....
मला चाटण म्हणोनी चाटले!
सडा राहून दुनियेचे.....
पहा संसार त्याने थाटले!
दिसावी अस्मिता आता कुठे?
अरे, हे गाव अख्खे बाटले!
तसूभरही न कोणी बदलले.....
फुकाचे रक्त माझे आटले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY