सौख्य रिश्तेदार झाले!
दु:ख माझे यार झाले!!
जे दगे निष्पाप म्हटले....
तेच वारंवर झाले!
काजव्यांचे सूर्य झाले.....
चौकडे अंधार झाले!
भामटे निवडून आले....
आणि अब्रूदार झाले!
केवढे भगदाड पडले....
चोरट्यांना दार झाले!
स्वार्थ साधायास त्यांचा...
केवढे लाचार झाले!
लोक जे होते गुणाचे....
ते खुदाला प्यार झाले!
शेवटी नेतेच झाले....
कैक कारोबार झाले!
शिक्षणाचे क्षेत्र सुद्धा...
चोरटे बाजार झाले!
जी फुले चोरीस गेली....
त्या फुलांचे हार झाले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY