Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

‘स्वप्न’ या प्रतिकावरील ५ निवडक शेर.......

स्मशानी अस्थि माझ्या घ्यावया येऊ नका कोणी;
इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने राख झालेली!
.........................................................................
स्वप्न बघण्याचा मलाही लगला इतका लळा की,
ती जरी साक्षात आली, वाटते स्वप्नात आली!
.........................................................................
एकाच तुझ्या दु:खाने जन्माची सोबत केली!
तू नव्हे, तुझ्या स्वप्नाने जन्माची सोबत केली!!
.........................................................................
मी रोज नव्या स्वप्नांचे प्रासाद बांधतो आता.....
होतात पूर्णही काही, काहींची परवड होते!
.........................................................................
काळजात बिनजखमांचा कोपरा राहिला नाही!
स्वप्नांना रात्रीपुरता आसरा राहिला नाही!!
.........................................................................

-------प्रा. सतीश देवपूरकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ