स्वत:बरोबर युद्ध जाहले!
अतीत ते अवरुद्ध जाहले!!
(अतीत म्हणजे भूतकाळ/इतिहास
अवरुद्ध जाहले म्हणजे अंत:पुरात बंदिस्त झाले)
विसळ विसळले एकसारखे......
हृदय अखेरी शुद्ध जाहले!
तरूण कायम राहिलेत ते........
मनातुनी ना वृद्ध जाहले!
कशास नस दुखरीच दाबली?
पहा किती ते क्रुद्ध जाहले!
विपश्यनेने पार बदलले........
हळूहळू मन बुद्ध जाहले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY