Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

तार तार छेडत तू काळजात ये!

 

तार तार छेडत तू काळजात ये!
प्रीतीची धून सखे, गात गात ये!!

 

एक सूर्यफूल तुझी वाट पाहते.....
सोनसळी किरणांच्या पावसात ये!

 

एकेका अश्रूचा मोती होवो.....
तू अशीच नयनांच्या शिंपल्यात ये!

 

बघ मी तर बिंब तुझे...ओळखले का?
खात्री करण्यास जरा आरशात ये!

 

विरहाचा तुझिया मी दाह सोसतो!
मधुनी तू स्मरणांच्या श्रावणात ये!!

 

तरळतेस तूच बंद लोचनांमधे!
गालावर ओघळत्या आसवात ये!!

 

घे लपेटुनीच मला भोवती तुझ्या!
मग खुशाल, कोसळत्या पावसात ये!!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ