तिळगूळ घ्या! जगाशी अन् गोड गोड बोला!
विसरा विवाद, तंटे अन् माणसांस जोडा!!
पैसा नव्हे प्रसिद्धी, सत्ता नव्हे सुबत्ता.....
माणूस ओळखा अन् माणूसकीच तोला!
बदलेल बोलणेही, बदलेल वागणेही!
एकेक शब्द तुमचा पण, साखरेत घोळा!
चिंता कुणास नसते? कोणास दु:ख नसते?
चव घ्या क्षणाक्षणाची, आनंद करत गोळा!
चुकते हरेक व्यक्ती, अपवाद ना कुणीही....
स्वीकारुनी चुका त्या वेळेत मात्र खोडा!
प्रत्येक माणसाचा गुण चांगला पहावा!
टीका, टवाळखोरी, निंदा, अभद्र सोडा !!
जो जो प्रसंग येतो, वाट्यास रोज तुमच्या;
घ्या बोध त्यातुनी अन् आधी स्वत:स जोखा!
जेथे उतार तेथे पाणी वहात जाते......
पाण्यात वाहणा-या, घालू नकात खोडा!
सरला सुमार आहे, बहुतेक मच्छरांचा!
आता तमाम दारे, खिडक्या खुशाल खोला!!
घ्या गुंज गुंज सोने जेव्हा जमेल तेव्हा!
होईल एक दिवशी, अपसूक एक तोळा!!
............प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY