तुझीच आम्ही अरे लेकरे, तुझीच पूजा करू!
वाटसरू सत्याचे आम्ही.....सत्यासाठी मरू!!
जुलूम, अत्याचार साहण्या, तूच ईश्वरा बळ दे.....
पशूपणाला माणुसकीने जिंकायाचे बळ दे......
वैर संपवू, भ्रांत घालवू, वाट तुझी आचरू!
तुझीच आम्ही अरे लेकरे, तुझीच पूजा करू!!
अज्ञानाचा किती दाटला तिमिर चौकडे पहा....
सत्याच्या सूर्याचे आम्हा ग्रहण भिवविते पहा....
अमावसेला पुनव कराया प्रकाशपूजा करू!
तुझीच आम्ही अरे लेकरे, तुझीच पूजा करू!
हतबल आम्ही, अपूर्ण आम्ही, तुझ्याविना ईश्वरा....
दयाघना रे, तुझ्या कृपेचे सिंचन कर तू जरा....
तुझ्याचसाठी जन्म आमुचा, तुला आपले करू!
तुझीच आम्ही अरे लेकरे, तुझीच पूजा करू!
------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY