Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

वादळातही धीर करोनी, पाजळणारी दीपकळी मी!

 

वादळातही धीर करोनी, पाजळणारी दीपकळी मी!
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, उजाडणारी दीपकळी मी!!

 

ओळख मजला, दीपशिखा मी, हृदयामधल्या गाभा-याची......
आत जरा डोकाव तुझ्या तू....प्रकाशणारी दीपकळी मी!

 

तुझ्या वळचणीचा आडोसा, असू देत रे, माझ्यासाठी.......
तुझ्याचसाठी, जळणारी अन् थरथरणारी दीपकळी मी!

 

असो कितीही कभिन्न काळोख, भोवताली वाटेमध्ये........
प्रकाशात माझिया पुढे चल, भणभणणारी दीपकळी मी!


(भणभणणारी म्हणजे दिशा उजळून टाकणारी/लखलखाट करणारी)

नकोस विसरू, अंश असे तू, खुद्द प्रकाशाचाच अखेरी.....
नाळ तुझी मी, तुझ्यामधे रे, लखलखणारी दीपकळी मी!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ