यार केले सागरी मी संकटांना!
घातला ना धूप मी केव्हा तटांना!!
वारले भट आणि निधडे जाहले ते....
कंठ फुटला बघ, समीक्षक पोपटांना!
टोमणे, टीका, टवाळी काल केली....
लागले ते आज ओवाळू भटांना!
दांडग्यांना दांडगाईनेच उत्तर....
हीच भाषा समजते त्या उद्धटांना!
केवढे वातड, चिवट, हट्टी अरे, ते.....
हाकलावे मी कसे या लोचटांना?
केवढी हिणकस मनोवृत्तीच त्यांची.....
या, उपेक्षेनेच मारू हलकटांना!
त्या विखारांना असा कंटाळलो की,
गोड केले मी अखेरी शेवटांना!
बाप मी होतो, कळाले खलबतांना.....
काटले त्यांच्या अघोरी मी कटांना!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY