कळेना कशाने मुकी होत आहे,
मनाची हवेली सुनी होत आहे !!
जुनी वेदना आंधळी ठार होती,
नवी वेदना पांगळी होत आहे !!
कुणी पेरले शब्द ओठात माझ्या,
जणू श्वास हा बासरी होत आहे !!
तुझे गंध येती दुरातून एैसे,
जणू अंग हे पाकळी होत आहे !!
किती दाटले मेघ हे चांदराती,
पुन्हा वेदना श्रावणी होत आहे !!
नवी रीत आहे अरे कलयुगाची,
गहू पेरता बाजरी होत आहे !!
असे चालती श्वास छातीत माझ्या,
जणू जिंदगी पाहूणी होत आहे !!
- शिवाजी घुगे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY