कारण नसता टीव्हीसोबत जागत असतो,
ढोलीमधल्या घुबडासम मी वागत असतो||
ठावूक नाही कधी कुठे ते हरवून गेले,
आजकाल जगण्याचे कारण शोधत असतो||
नको वाटते बधीर नाते अ'ध जगाशी,
आजकाल मी भि'तीसोबत बोलत असतो||
शुद्धीवर राहण्याची कि'मत झेपत नाही,
स¡जसकाली पेग नशेचा ढोसत असतो||
वय वाढता उगाच नाही पाठ वाकली,
थडग्यासाठी जमीन माझ्या मोजत असतो||
त्याच बातम्या तीच माणसे काय करावे?
आजकाल मी पुस्तक ताजे वाचत असतो||
किती मोजल्या शुभ्र च¡दण्या गणती नाही,
रातरातभर हाय! एकटा जागत असतो||
शिवाजी घुगे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY