Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

शेतक -यांनो!!

 

फितूर आहे दुष्ट किनारा शेतक -यांनो,
चला बघू या अन्य सहारा शेतक -यांनो!!
जीवन मिळते बहुदा ताणतणावासाठी,
खूप पोळतो नग्न निखारा शेतक -यांनो !!
पोट लागले पाठीला का तुझ्या घराचे,
पहा तयांचे पोट नगारा शेतक -यांनो !!
शब्द मुके पण डोळ्यांतून त्या चक्क लबाडी,
लाच मागतो भ्रष्ट इशारा शेतक -यांनो!!
शेणमुताचा शुष्क पसारा तुमच्या दारी,
घरात त्यांच्या मोरपिसारा शेतक -यांनो !!
कीड लागता झडून गेले पीक सुखाचे,
पुष्ट किड्यांवर वीष फवारा शेतक -यांनो !!
काठी घेवून ठेव दरारा व्यापा -यांवर,
उसळू द्या कैफात धुमारा शेतक -यांनो !!
कुणीच नाही वाली अपुला कुणीच नाही,
नजाकतीने बंड पुकारा शेतक -यांनो !!
कुस्करती आयुष्य तुझे हे रक्तपिपासू,
घाला त्यांचे वंश गटारा शेतक -यांनो !!
पुरे जाहली काळोखाची अंध गुलामी,
मुठीत घेवू तप्त समीरा शेतक -यांनो !!
माड्यांवरती चढती माड्या पोटभरूंच्या,
कुठेच नाही तुम्हा निवारा शेतक -यांनो !!
कुठे हरवले स्वातंत्र्याचे मंत्र तुझे ते,
झाले सारे शब्द खटारा शेतक -यांनो !!
गच्ची धरूनी हिशोब मागा परिश्रमाचा,
गळफासाचा दोर नकारा शेतक -यांनो !!

 

 


— शिवाजी घुगे.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ