Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

विडंबन

 

चिचुकेच मला खातांना वरणावर कळले होते,
वमनाने केली सुटका पचनाने छळले होते !!
मी नव्हतो 'उंच ' कधीही व्याखेत पुरस्काराच्या,
मी नाव तरीही तेथे हमखास घुसडले होते !!
जो नव्हता विषय कधीही माझ्या बुद्धीचा तरीही,
मी नको तिथे केंव्हाही हे तोंड खुपसले होते !!
चावून चोथा झालेले माझे नेहमी रडगाणे,
गावून येथे दुनियेला दररोजच पिडले होते !!
उत्तुंग पातळीवरचे कित्येक कवी ते होते,
मी काडया केल्यानंतर मागेच रखडले होते !!
सोडूनिया लाज जगाची वेडे काळीज हे माझे,
सन्मान मिळविण्यासाठी शतदा धडपडले होते !!
ते गोड गुपीत प्रतिभेचे मज कधीच कळले नाही,
मी शब्द जुन्या कवितांचे चुपचाप पळविले होते !!
भेटला मला जो कोणी लेखक दमदार कसाचा,
मी पुस्तक त्या व्यक्तीचे हलकेच उसवले होते !!
जन म्हणतील काय तयाची पर्वाच मी केली नाही,
पैसा मोजून मी सारे सन्मान मिळवले होते !!
मी तारस्वराने माझी कविता खिंकाळत होतो,
मी बसलो तेंव्हा श्रोते सारेच उधळले होते !!
(स्व.सुरेश भटांच्या रचनेवर आधारीत
डुप्लीकेट कवी -लेखकांचा समाचार घेणारे

 


विडंबन काव्य)
-शिवाजी घुगे.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ