चोट जब जब युँ ही
खाते थे हम...
सिहरते हुए हमे देखकर
आँखे तुम्हारी भी होती थी नम...!
देखकर पनपतीँ बुराईयोँकोँ
जब जब दुःखसे दहकते थे हम...
तुम आये हँसी का झोँका लेकर
फिर से खुशीसे महकते थे हम...!
अपनीही सोच से जब
हुए कई शिकवे और गिले...
तेरी उम्मीद से ही मुझे
हर सवाल के जवाब मिले...!
जब आज ढुँढना चाहुँ
वहीँ हँसी लम्हे और शोर...
जो हो नयी मंजिले मुस्कान नई
तो फिरसे चल पडे खुशियोँ का दौर...!!
मुळ कविता...
-: प्रेमवेडा :-
घाव जरासा मला लागता
तुझे गं काळीज किती फाटायचे...
अन् मी खिन्न झालो निरर्थक तरीही,
तुझ्या डोळ्यांत गं अश्रु दाटायचे...!
पाहुनि ही दिशाहीन गलबतं सारी
किती गं उदास वाटायचे...
पण तुझ्या त्या गोड हसण्यानेच नुसते,
सारेच कसे गं मिटायचे...!
विचारांनी माझ्या मनात जेव्हा
नवेच युद्ध पेटायचे...
तू हासलीस की एकदा मग,
लगोलग उत्तर भेटायचे...!
आता शोधतो नवे किनारे
सारेच तटस्थ रहायचे...
मिळाली संधी की मागेन स्वप्न,
दिवस पुन्हा ते पहायचे...!
- शुभम साळुंखे
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY