Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

ते नऊ दिवस...

 

सरतेशेवटचा निरोप घेऊन
निघालास रे थकून भागून
आता वाट पाहणे तुझी निरर्थकपणे
एवढेच नशिबी आहे

 

तुझ्याचसाठी थाटले आहे आता
माणसे, मंडप नि वणवणती चिता
तू येथून पसार झालास तरी
तुलाच शोधत राहणे निरर्थकपणे
एवढेच नशिबी आहे

 

रडता रडता उलटली रात्र
मन पार अलिप्त उदास असताना मात्र
तुझी आठवण निघणे
एवढेच नशिबी आहे

 

मरगळ झटकून त्या नऊ दिवसांची
आज अजुन एक चिता रचतो आहे
आता इतके क्षणिक आयुष्य माणसाचे
नवव्या दिवशीच पुन्हा एकदा खचतो आहे

 

क्षणभराच्या आयुष्याचे मोल
आता शोधतो आहे
पण शोधणे केवळ नाममात्र
आता पुन्हा
ते नऊ दिवस बघतो आहे

 

जन्म मृत्यूचा फेरा
'सर्वानुमते' कुणालाच चुकत नाही
मात्र कंटाळून या आयुष्याला
उगाच कुणी विकत नाही
पण इतके असता,
आता शेवटपर्यंत पुन्हा ते नऊ दिवस बघणे निरर्थकपणे
एवढेच नशिबी आहे...!

 

 


- शुभम साळुंखे

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ