Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

क्रियापदांचा खजिना

 

 

treasure

 

 

भाषेमुळे आपल्या मनातले विचार, भाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्‍या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. परंतू मातृभाषा सोडून आणखीन एक दोन भाषा जर येत असतील तर त्याचा देखील आपल्याला फायदा होतो हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात 'Knowledge is not burden' ज्ञान हे ओझ नाही.

इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढवतच जात आहे. संपर्क - माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्‍याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते.

एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला शब्द साठा वाढविल्यास शिवाय ती भाषा आपण शिकूच शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी शब्द संग्रह वाढवण्याची सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही . पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास. आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल.

o पुस्तकाचे नाव: क्रियापदांचा खजिना

o लेखक: राज धुदाट

o प्रकाशक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील

o प्रकाशन: कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर

o पृष्ठे: 44 (कव्हर सह)

o आकार: A 4

o मुल्य: 50

o विषय: इंग्रजी शब्दकोश

o वर्गवारी: शैक्षणिक

o संपर्क: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ