ज्ञाना लागली समाधी
पोटासाठी हरीनाम
मुंबाजीच्या हाती टाळ
नाही कुठे तुकाराम
रोज रडते आवली बसून इंद्रायणी काठी
म्हणे सांग माझ्या धन्याची कधी तारशील पोथी
लाख दुक्खांनी जयाला दिली नाही जमानत
मग गेला कसा तुका एकटाच वैकुंठात
तुझ्या पंढरीत विठू
दांभिकांची मांदियाळी
नाठाळांच्या मुठी देव
भगतांच्या हाथी थाळी
तुषार शिल्लक
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY