Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

काल तुझ्या घराच्या वाटेवरून

 

 

Vijay Patil

 

 


काल तुझ्या घराच्या वाटेवरून
जाताना वाट पहिली तुझी
पण तू कधी माझ्या जवळ आलीच नाही
माझ्याशी दोन शब्द बोललीच नाही.

 

आता पर्यंत कुणाची
एवढी आतुरतेने वाट पहिली नवती
नजर कधीच कोन साठी
एवढी आतुर नवती
मनाची ओढ
एवढी कधीच कोणासाठी नवती
पण तुला ती कधी समजलीच नाही

 

पण जेंव्हा तू समोर आली
माझी तुझ्यावरून नजरच नाही हटली
बोलत होती कोणाशी तरी
हसत होती नझर चुकवत माझ्यावरी
आणि मी वेडा एकटक तुझ्याकडेच पाहत होतो

 

वाटत होत थोड्यावेळ थांबाव
तुझ्याशी दोन शब्द बोलाव
पण माझी हिम्मतच झाली नाही
वाटल तू पुढे येशील
दोन शब्द बोलशील
पण तुझे पूल पुढे
सरकलेच नाही
आणि मी वेडा तुझी वाट पाहताच होतो

 

माझ्या वेड्या मनाला
कोण होते आवरणार
केला मेसेज तुला
रिप्लाय पण तुझा आला
पण मनाला कोण सांगणार
ती फक्त एक तुझी औपचारिकताच होती

 

तुझ्या त्या रीप्लायवर
हसून अजून एक मेसेज केला
तुझ्या बोलण्याचा मनाला आधार मिळाला

 

एके दिवशी हिम्मत करून विचारले तुला
पण हसून हसून तुझा नकारच मिळाला
तिला सोपे होते बोलायला
विसरून जा मला
पण माझ्या वेड्या मनाला
कोण समजावणार
त्याला फक्त तिचीच ओढ होती
मनाला आवरणे इतके सोपे नवते
माझ्या अश्रुना थांबवणे इतके सोपे नवते

 

काल तुझ्या घराच्या वाटेवरून
जाताना वाट पहिली तुझी
पण तू कधी माझ्या जवळ आलीच नाही
माझ्याशी दोन शब्द बोललीच नाही.

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ