Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

आभाळा एवढी माया

 

सखे ,

 

 

आभाळा एवढी माया
कर पाठराखण
ममतेतुन ना व्हावी
संसाराची पोखरण
सखे तुझ्या प्रेमाला
नसे सर गं कुणाची
परि मला लागलीये
गोङी माझ्या संसाराची
बदललेय काहीच नाही
दुधावरची साय हि
सासु रुपात लाभली बाई
अजूनी एक आई
मी जपतेय तिला
करतेय मी आदर
माझ्यासाठी फुटतो
त्या माऊलीला पाझर
सखे मोङ मनाचे खेळ
संशय उतरवून टाक
मनावरचे सारे दङपण
तू काढुन टाक
मी भलतीच ईथे सुखी
मनी ईथे कुणाच्या
कसलीच नाहीये गं आढी
तु मला जगवले
तू मला वाढवले ,सखे
सासूने मला घङवले

 

सासूने मला घङवले
मला नकोत भांङणे तंटे
की त्या कुरबूरी
सोङ लुङबुङी सखे
राहू सुखी ,
तू तुझ्या घरी
मी माझ्या घरी . . .

 

 

अवघङ शब्दार्थ
सखे :- मुलीच्या संसारात ङोकावणार्या आईंच काळीज

 

 

Vishu

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ