Vishal Lonari
आजही एक पणती फुटली
फुटली ? की फोङली !!
अरे . . . . दैत्यांनो हात चळचळतातच कसे ,
धजवता कसे ?
असे दृष्कृत्य करताना !!!!
काळ्या काळजाने
काळ्या कुरुप अंधारात काळ्या पिशव्या
नेउन पुरतात तुम्ही !!!
काळे कर्म असे
का घङवतात तुम्ही !!!
का विचार येत नाही
एकदातरी
तुमच्या आईचा ,
तुमच्या बहिणीचा ,
तुमच्या प्रेयसीचा ? ? ?
ती हि एक स्त्री आहे , कुणाचीतरी 'सुता ' आहे ना ती ?
मग का अट्टहास मुली संपवण्याचा
का तान्हा बाळाची नाळ जगापासून
वेगळी करु पाहता ?
तुमच्या वैभवाला वारस
हवा ना !!!
पण तुमच्या फाटक्या
झोळीत ,मुलाचे दान
टाकणारी ती एक स्त्री
आहे . . . . . . .
विसता का ?
मग का जाळायला उठलात त्या ममतेचा पान्हा
ती मायेची मंदाकिनी
का तीचा प्रवाह
असा विस्तवाने सुकवू
पाहता ?
अनवट किलकिलाट
लोभस गोजिरीचा
हिरावू नका कधी
हक्क स्त्री जन्माचा
साश्रु नयनी , कष्टी गात्री ,जी मंगल दायिनी नका हिरावू कधी हक्क
आई जन्माचा
झटका विचार गर्भलिँग निदानाचा नको अविचार स्त्रीभ्रुण हत्येचा
अरे ,हा एक सृष्टी निर्मित अविष्कार , घङवेन चमत्कार ती
तुमच्या भाग्योदयाचा
जर बहरायचा असेन
संसार दोन परिवारांचा
. . . . . . . .
नको हिरावू कधी
हक्क स्त्री जन्माचा
विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY