Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

आपण दोघे

 

आपण दोघे
कधीतरी होवू का
एकमेकांचे

 

प्रश्न सतावे
माझिया अंतरास
दिनी न रात्री

 

जगाचे बंध
द्यावे का झुगारुनी
ग्रासते भय

 

तू तिथे मी
फक्त म्हणावयाचे
खोटे सांत्वन

 

तुझ्या माझ्यात
एकच दिवा पेटे
प्रित अंतरी

 

अंतरास पुस
भले मोठे अंतर
खरंच आहे ?

 

मी वेङा झालो
ङोयापुढे हासते
राधा बावरी

 

कान्हा तुझा मी
अशी वेङीशी कथा
आहे आपुली

 

सांग ना सखे
कधीतरी होवू का
एक मेकांचे

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ