मी बाजूला होणारा .....
मी शेवट जाणारा
माझ्या बंद पापण्यांत तुझी
स्वप्न जपणारा
असा मी तुझा व्हालेंटाइन
तुझ्यावर खूप प्रेम करूनही
तुला कधीच न
समजलेला
असा मी तुझा व्हालेंटाइन
तू नाही म्हणत असताना
पण , माझ्या मनाचे
अश्रू तुला दिसले
तू परत भेट राहिली खरी
पण आता आपल्यातले
ते अंतर न्हवते ग उरले .....................................................................
तुझ्या मैत्रीतच सुख मानणारा
अबोल राहून , मनाशी रडणारा
तुझाच असूनही
तुझ्यावर हक्क नसलेला
प्रेम करूनही
व्यक्त न झालेला
तुला कधीच न समजलेला
असा मी तुझा व्हालेंटाइन
- विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY