आठवण , किती सहज येते , कुणाचीही
ङोळ्यात तितकीच सहज ,तरळते
आठवणीत समरसुन ,
गुंतुन राहावसं वाटते , कधीही
पण . . . .
होता येत नाही ना ,
आठवणी येतात ,जातात
आयुष्य थांबवता येत नाही ,
खूप खूप वाटलं तरी ही
साधा फोन देखील
करता येतं नाही ,
ईतकं का आपण बीझी झालो ?
की खरंच कोणास विँसरलो ?
नसेलंच बहुदा ,
काय असेल उत्तर !
आठवणीँच्या प्रश्नांचे ?
जे क्षण एकत्र गेले ,
त्यांच्याच आठवणीवर
किती काळ जगायचे
उत्कृष्ट असली तरी
कितीदा त्याच गाण्यांला
ऐकायचे
परत परत त्याच गाण्यांवर
पाय आता थिरकत नाही
तसंच काहीसं ,असते
आयुष्य
पुन्हपुन्हा तीथेँच त्या जुन्या जीर्ण
क्षणांना आठवत कितीकाळ जगायचे !
सहवास जुन्या क्षणांचा
हसवत नाही ,रङवत नाही
सोसवत ही नाही ?
नसेलंच बहुदा
आताशा तर भीतीच
वाटत असते मला ,
श्वासांची चढाओढीत
एखादा थांबलाच तर
काय होईल . . . . .
माझा मी मुक्त होवून
विरुन ही जाईल
इतकं प्रेम ,माया ,आदर
सार्याँकङून मिळाले
कधी मी मिळवली
पण मोक्षाला याकारणे
गतीच लाभेल ना
पर्तुँ , ज्यांनी ज्यांनी
शाबासकी वाचली कधी
त्यांनीच माझी ,बातमी वाचावी !!!!!
सार्याँनाच सहन
होईल का हे ?
बहुदा नाहीच . . . .
खरंच आहे ,
आठवण , किती सहजच येते
आता पुन्हा जगायला हवं
नव्याने भेटून ,नव्या
आठवांस बनवायला हवं
कुणी सांगावे ?
धावता धावता अचानकच
खिळ्याला टांगते आयुष्य
पङून खळ्ळकन
फुटले तर ! ! !
फिरता फिरता जीवनाचा फँन ,ग्रीस सुकून
कायमचा थांबलाच तर
होईलच ईच्छा भेटायची
मला , अतोनात जरी
संपून प्रवास कुठे मी
अनंतात विलीन झालो तर
म्हणूनच सांगतो
भेटायलाच हवं ,
चारक्षण मोकळेपणाने
जगायलाच हवं
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY