धुंद धुंद मदहोशी रे
धुंद धुंद
उधळली मुक्तक मकरंदाची रे
धुंद धुंद
अलवार सरी बरसुनी आल्या
गर्भार शब्दांतूनी भावना अंकुरल्या
थेँबनक्षत्रांनी ही धरा सजली
कळी कळीने बहरुन गेली
मनी तुझी प्रित जेव्हा उमलली
धुंद धुंद मदहोशी रे धुंद धुंद
झुळझुळली सप्तक प्रेमाची रे
प्रेमाची नशेने समा पसरली ही
धुंद धुंद मदहोशी रे धुंद धुंद
हिरव्या शालूचा पदर अंगावरी
गुलाबी ङोळे बोलती ईशार्यातुनी
आजवर तमा तुजसाठी बाळगली
ये जवळी बघ रात्र ओसरुन चालली
गहिवरल्या सुखासाठी काया आसुसली
धुंद धुंद मदहोशी रे धुंद धुंद
वाराही मंजुष जरा वाही
सोबतीस चंद्राच्या चांदणी राही
धुंद धुंद मदहोशी रे धुंद धुंद
उधळली मुक्तक मकरंदाची रे
धुंद धुंद
Vishu
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY