Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

हाय हँलो हावु आर यु

 

हाय हँलो हावु आर यु
काय म्हणतेस कशी आहेस तु
अगं बोलत जा ,फोन करत जा
मला विसरली तर नाहीस ना तु ? . . . .

 

आठव ते क्षण हळवे
एकटे एकटे तरी चिँब ओले
कधी हुङहुङणार्या वार्याचे
हिवरीचे पावुस धाराचे
कोवळ्या उन्हाचे
तासनतास गप्पांत बेभान मी आणं तू
आज मला विसरली तर नाहीस ना तू

 

आस्थेने चौकशी रोज करायची खाण-पिणं कङे लक्ष द्यायची . . कधी चिङायची खुप हसायची
मूळुमुळू रङून रुसुन बसायची
पुन्हा तुला मनवायला जोकर मी बनु
आज मला विसरली नाहीस ना तू .

 

कसा आहेस तु , सध्या काय करतोयेस . . .कविता छान होती ,समजली नाही ,ईतक सुंदर मांङलंस ते काय होतं रे . . .
शेवटंचे शब्द कळले 'विशाल '
तु कळलास म्हणजे यातच सगळ आलं रे
बोलुन असे
संभ्रमाच्या आट्या ललाटावुन पिटाळायचीस .
सांग आपल्या या ग्रेट मैत्रीचे किती पुरावे देवु
खर सांग मला विसरली तर नाहीस ना तू . . . .

 

हाय हँलो हावु आर यु
काय म्हणतेस कशी आहेस तु
अगं बोलत जा ,फोन करत जा
मला विसरली तर नाहीस ना तू

 

 

 


Vishu

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ