हिरवळ ,
मी कधीकधी ,या ईथे शांत बसून असतो
आयुष्याची दुपार असुन ही
हि , जागा माझी नाही
कळत असुन ही
काळ मागे सरकत नसतो
मागल्या दिवसांत चुकलेलं ,
ठावूक असतं ,
सुधारणार नाही . . . .
तरी ही उगाच मनात
तृणाची पाती ,लवलवती ,ङोलती
दवबिँदू त्यावरती ,
चमकत असतात . . .
एवढं सगळं मनात उगवुन ही
मी एकटाच बसुन असतो
कोणाशीतरी बोलतो , ओठ न हलवता
मी हिरवळ घेऊन बसुन असतो ,
माझ्या वाटेचं एकलेपण
अत्यंत बूजर्यापणाने
सार्वजनिक करत . .
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY