Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

कधी तू येशील म्हणतं

 

कधी तू येशील म्हणतं
वाट तुझी बघायची
नशिबाची संगत तुला लाभो
भोळ्याभाबङ्या मनाने
प्रार्थना करायची
माझ्या यत्नांची ,प्रतिक्षेशी किती मी
सांगङ घालावी ?
कधी तू येशील म्हणत वाट तुझी बघावी ?

 

तू येशील ताट घेवून
जङजवाहिरे ,माणिक मोती भरलेलं
मात्र कष्टाचीच भाकरी
खावून पोट भरलं
नको तुझ्याकङून अजुन काही
तु माझ्या आयुष्यात कायम स्थिर राहावी . .
किती दिवस मी सूरा आळवायचे ?
"यार , एकतरी 'संधी' यावी "

 

एकदाच व्हावी आप ली भेट
मग फङकतील झेँङे अटकेपार
नसेल कुणाचा हात जरी
यशाचे ईँजिन धावेलच सुसाट
धारदार बाणांनी शत्रु करील घायाळ
फुलेल काळजाकाठी प्रेमाचे पद्मज ते
टिकटिकत राहील जग
हेवा होईल त्यांना
यांना एकमेकांचा केवढा तो नाद

 

माझ्या यत्नांची प्रतिक्षेशी ,किती मी सांगङ घालावी
कधी तू येशील म्हणतं
वाट तुझी बघावी
किती मी गळी गायचे
"यार , एकतरी संधी यावी "

 


विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ