किती लाघवी . .
आणि मंजुळ वाहे
नीरनंदीनी
गावया किर्ती
तुझी ,मी वेचतो
शब्द हे मनी
गुढरम्य मी
हरपले भान हे
नदीकिनारी
तू शमवी गं
तहान या जीवाची
खळखळूनी
अथांग तुझ्या
ओँजळी भरलेले
अमृत मोती
दिधली किती
सुख संपत्ती , नाही
होत गणती
ऐक जननी
पांग जन्माचे , मज
नाही फिटती
खंत वाटते
पात्रात जेव्हा ,जर्द
वेली सजती
अप्रुप दाटे
कधीही लोका शिक्षा
का न ठोठवी
किती थोरणी
आणि भरीव वाहे
माझी गोदाई
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY