वेळ: दुपारचे १:५९.
स्थऴ: चितळे बंधू, डेक्कन, पुणे.
दुकानाचे शटर खाली ओढले जात असते. शटर बंद होणार इतक्यात एक जण जोरात सरपटत आत शिरतो.
...
तो चितळ्यांना म्हणतो "आज मी कोणत्याही परिस्थीतीत दोन नंतर बाकरवडी घेऊन दाखवणार..!"
बाहेर सगळी गर्दी जमा होऊन बघत असते...
१० मिनटे आत जोरदार आदळ-आपट चालू असल्याचा आवाज येत असतो...
तेवढ्यात शटर उघडले जाते व तो माणूस रिकाम्या हाती जीव घेऊन पळून जातो.
भाऊसाहेब चितळे हात झटकत बाहेर येतात. लोक विचारतात, "काय झालं?"
भाऊसाहेब: "कुठून कठून येतात..., म्हणे दुपारी दोन नंतर बाकरवडी घेऊन दाखवतो...."
लोक: "कोण होता तो?"
भाऊसाहेब: "काय माहीत, पण नाव काहीतरी 'रजनीकांत' असे सांगत होता..."
Vishal Lonari
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY