Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

लिहायला बसलो कविता

 

लिहायला बसलो कविता ,
मात्र काही सुचत नाही .............
एक तुझ्या आठवणीशीवाय ..........................
मी बेभान होवून गिटार वाजवताना ,
तुझ तितकेच हरखून जात ऐकणे ...............
माझ्या तंद्रीत मी फसलेलो पण तुझे ,
मात्र माझ्यात हरवत जाणे ,
खरंच आता , माझ्या प्रत्येक गाण्यात
उरलेच आहे काय , या तुझ्या
आठवणीशीवाय .............................
मी कविता लिहित असताना ......................
शब्द बसलेत गाल फुगवून .....................
आणि कल्पना , कल्पना नाही
कुठे निघून गेली रुसून ...............
सार्या उपमा आज रोष करताय
तुझ्याच वर्णनात रचायचे ,
तुझ्यावरचेच प्रेम मी जगाला
ऐकवायचे , कसा वेडा हट्ट आज त्यांनी धरलाय ................
त्यांचा काय दोष ग ...
खूप निरागस आणि निर्मल गोष्टी आहेत त्या ,
त्यांना कुठे कळते दुनियादारी ......
हृदयाच्या मंदिराबाहेर ,
असतो प्रत्येक प्रेमी भिकारी ......
इथे कधीच कुणी तथास्तु आशीर्वाद देत नाही .....................
कारण प्रेम कधीच मागून मिळत नाही .....................
अशीच असते गोष्ट खरी .
का नियती बदलत घेत असते फेरी ,
आपल्याला का भोवर्यातून बाहेर सुटता येत नाही ,
आजकाल अशा खूप सार्या प्रश्नांचे उत्तर
सापडत नाही ..
का कुणास ठावूक मी शोधतही नाही
कदाचित म्हणूनच
लिहायला बसलोय कविता
मात्र काहीच (कसं) सुचत नाही ........

 

 

विशू

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ