लिहूया काही असे ठरवले खरे , पण काय ? नि कुणावर लिहावे ? कधी लिहावे ? कसे लिहावे (बसल्या बसल्या , कि उभ्या उभ्या ? यापेक्षा सकाळी कि संध्याकाळी असा पेच आहे ) पण लिहायचे तर आहे बुवा , चला या सगळ्या प्रश्नांचे काटे फाट्यावर फेकून देतो आणि लिहायला लागतो , उत्तर मिळालेले नाही तरीही ....
लिहिताना काय करायचे असते ओ ? सूक्ष्म , काटेकोर विचार ? कि अंतर्मुख वगेरे म्हणतात तसे व्हायचे असते . तसे मला होता येत नाही बर ... कसे होतात ते ? मी तर मस्तपैकी आरामशीर खुर्चीवर बसून लिहिणार आहे ... अगदीच विचार वगेरे मांडणारा मी नाही , पण शेवयांचा पुडा जेवढ्या त्वेषाने फोडावा तसेच मनातला हा शब्दांच्या साबुदाण्याचा पुडा मी फोडणार आहे . मग त्याचे वडे (कि धिंडवडे ) वा खिचडी करायची हे ज्याच्या त्याच्या विवेकरुपी चुल्ह्यावर , अवलंबून आहे ठरवा किती जळायचे ते .
तसा मी एकदा माझ्याकडे पाहिलं तर्रर्र !!!! अरे बाप रे ????? बराच मोठा घोळका दिसतोय रेड्यांचा ?? अरे नाही हि तर माणसेच आहेत ...............माझ्याशी रेद्यान्प्रमाणे वागलीत म्हणून मनात त्याना रेडा बनवलाय ................बिचारी !!!!! नको यांच्यावर नकोच काही लिहायला .
चला जरा थोडे पुढे सरकतो .......
अरे वाह !!! इथे मोठा घंटारव चालू आहे . धूप , निरंजन , पणत्या , आरत्या कित्येक पुष्पहार अन पानांनी हा कोपरा सजलाय , नक्कीच हि माझ्या मनातली शक्तिस्थळ असतील नव्हे आहेच ... अनेक मान्यवर दिसताय ,आप्तस्वकीयान्साम्वेत , मित्र-मैत्रिणी सोबत काही असे लोक आहेत जे माझ्या ओळखीचे नाहीत , परके आहेत पण त्यांच्याकडून अनेकदा किंवा एकदा तरी अशा घटना घडून गेल्या कि त्यांनी मनात ऋषितुल्य स्थान द्यावेच लागले ........काय करू मन म्हणजे मानसं साठ्वायचं साधंच झालय आहे , खूप लोक राहतात , ज्याप्रमाणे किशोर कदम यांच्या एका कवितेत ते म्हणतात कि माझ्या हृदयाची सर्जरी केल्यास माणसेच बाहेर पडतील तसेच माझ्या मनाचे आहे . इथे मला पटलेले , न पटलेले , आवडणारे , न आवडणारे , भावलेले , दुखावलेले , असे अनेक लोकांचे गोतावळे सापडतील . कधी भविष्यात माझ्या हयातीत मन कुठाय हे जर कळले तर नक्कीच सर्जानाना माझ्या मनात माणसांचे झुंड सापडतील , लोकसंख्या भरमसाठ वाढून जाईल .................................हाहाह !!!! काहीपण बोलतो , लिहितोय ना ! तात्पर्य एकाच चारोळीत सांगतो ,
“मी तुला विसरणार नाही ,
अन तू मला विसरशील ,
असे मी होऊ ,
देणार नाही .....................................ओय ..........
माणसांची आवडच आहे मला , खूप खूप . असेच लोकांना लक्षात ठेवायला आवडते . पण बर्याचदा लोक मला विसरतात तेव्हा खूप वाईट वाटते , माझ्यासारख्या हळव्या मनाच्या माणसाशी कोणी कशी दुष्मनी करू शकते हे मला न उलगडणारे कोडे होवून बसते ..........
लेख फार कंटाळवाणा होतोय का ?? होत असेल पण इलाज नाही , असा ठरवून काय; तेच तेच लिहायचे ना , त्यापेक्षा असा उद्दिष्टाशिवाय भटकण्याची एक वेगळीच गम्मत आहे ती मला लेखनात अनुभवायची आहे , तरी मी असाच भरकटल्याप्रमाणे लिहित जाणार आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी .(त्याला पैसे देखील लागत नाही ) .
वर मी एक चारोळी लिहिली न !!!!!!!!!!!!! अरे हो खर्रच कि . चला आपल्याला एक गोड बातमी , मी ठरवलय कि जरा माझ्या कवितेवर बोलू काही , माफ करा कवितेवर लिहू काही ....दोन गोष्टी होतील लेखाला विषय मिळेल आणि ज्यात आपण माहीर असतो त्यावर खूप छान बोलू शकतो म्हणून पुढील लेखनाचा उद्देश हा कविता असेन ....
माझ्या कवितेवर मी बोलणे हे माझे सदभाग्य समजतो , कारण आजवर अनेक जन अनेकदा बोललेत , कुणी गुपचूप कानात , कुणी थेट मनात , कुणी जाहीर , असे अनेक अनेक प्रतिक्रिया माझ्या कवितेवर आल्यात . चांगल ते घेतलं वाईट जे ते गंगेत फेकले ....
जिंकावेसे वाटते , हरावेसे वाटत नाही
पण तरीही एकदा
हरल्यावाचून गड्या
“जिंकल्याचे मोल काळात नाही
आणि हरल्याविना जिंकण्याची
नशादेखील चढत नाही .”
ंह हि सत्यता आधी मलाच पटली असणार नाही का ? म्हणून तर जगाला सांगावे असे उमगले .चला जरा याच कवितेवर लिहू काही ......
काय नेमक लिहावे ? अर्थ , अनर्थ कि अजून काही ईप्सित , गिमिक . नाही मुळात कळू देण्यासारखी आहे ते या ओळींची नाळ जी मनाशी जुळली आहे ती तोडून त्यातून त्यांचा बोध जन्मास घालणे .तीच अस्तित्व उमटू देणे .. आणखीनच खोलात जावून सांगू , मला लिहायची आहे ती सिचुएशन या कवितेसाठीची , तिच्या सुचण्याला कारणीभूत असलेली आणि काय आहे ना , जगात प्रत्येक कविता मग ती कितीही भारदस्त वा पोकळ असो ती का सुचली हे महत्वाचे असते ते जर काळले ना बॉस कवितेची खरी मजा घेता येते , मग सगळेच पदर आपोआप उलगडत जातात आणि ती मग मानता रुजून राहणारी कविता होते .......बाकी कवितेबाबात असणारे समज , गैरसमज , नियम हे सारे नंतर लक्षात घ्यायचे असते .
आताही असेच काहीसे करतोय या कवितेबाबत ...
असंच बसल्या जागी सुचलेल्या या ओळी आहेत , मनात विचार आला , पटला , आवडला , आणि मग तो मनात खदखदू लागला , आता मनात खदखदू लागले कि आपसूकच वेदना होते आणि मी ते ओळींतले तत्वज्ञान मांडायचे ठरवतो . उद्देश काय ? जगाला शिकवणे , माझ्या बुद्धीचे दर्शन घडवणे . नाही ओ असा अजिबात नाही , मनातली खदखद बाहेर काढून टाकणे , फेकून देणे (अक्षरशः) या करिताच माझा असतो अट्टहास , मग मी त्या ओळी कागदावर उतरवून , जगासमोर भिरकावून देतो तेव्हा जावून मन संचीत आग्निदोह उसळायचे थांबवतो , प्रकोप शांत होतो . अगदी मी असा बनतो जणू ध्यानस्थ ऋषी . हाच असतो माझ्या रचनांचा परामर्श .
असे का होते ? कसे घडते ? याही प्रश्नांचा मी थोडा विचार केला तर लक्षात आले माझ मन म्हणजे चंद्र आहे , हो असे म्हणतात माझ्या जन्मावेळी अमावास्या होती , म्हणून कदाचित त्यवेळेस चंद्र नेहमीच्या ड्युटीवर नसल्याने माझ्यात येवून स्थिरावला . पण १५ दिवसानंतर त्याला पूर्ण दिसायचे होते म्हणून त्याने माझ्या मनाला स्पर्श केला तेव्हापसुन ते आजतागायत मन चंद्रपणे बनलय शीतल , थोडेसे सावाळलेले , पण प्रत्येकास प्रेमाचे चांदणे देणारे . असा एक दृढ समाज माझ्याविषयी सगळ्यांत आहे , ज्यांचा नसेल त्यांनी तो करवून घ्या . माझे मन म्हणजे भिरभिरणारे , कवीचे , शशिधर .मन म्हणजे चंद्र .
बघा कविताच्या ओळींतून मी पुन्हा थेट मनात शिरलो , आता जवळपास सर्व मन रिते झालेय , माणसे निघून गेलीये , माझ्या मेंदुसाम्वेत , गात्रांसाम्वेत मन एकट तेवढ बाकी राहिलंय ......
असंच आहे मी लिहिताना विचार करणारा , विचार करता करता लिहिणारा . हे मी नाही एका रसिकाने मला सांगितलाय ...छान ना .
मी खूप स्वताबद्दल बोलत ईगो जपत असतो , वाटते ना !! हो आवडते मला , उगाच दुसर्याच्या वाटेस जावून त्याच्या शेपटीस दुखवण्यापेक्षा मी आहे असंच गर्ववान तेच बर्र आहे ओ .......
माझ्या लिखाणाबद्दल अजूनही मला सांगायला आवडेल ते असे ...
लिहायला घेतले ‘काही’
‘काही’ काहीकेल्या सुचत नाही
‘काही’ तरी लिहायचेच
नाहीतर मग झोप येत नाही .
या सबबिमुळेच मी कधीही एक प्रवाही , एक संथ असे लिहू शकत नाही , अगदी परीक्षेत सुद्धा मला ते जमाने शक्य नाही . मला मी पदवीधर कसे झालो याचे कधी कधी आश्चर्य पण वाटते.......जे मानत वाजेल ते ताडताड लिहून काढतो बस.....................
आता आपण वाचला तो शब्द ताडताड होता का ? अगदी बरोबर ओळखले मी ताडताड या शब्दावरच आता लिहिणार आहे पण जरा ढंग वेगळा वेगळा ..................................................
खाडखाड . हा शब्द मला मागच्या संदर्भावरून आठवला . फार पूर्वी तार यंत्रणा अस्तित्वात आली जी गेल्या वर्षी बंद करण्यात आली .१४ जुलै २०१३ रात्री नावू वाजता शेवटची तार पोस्ट होवून एक तार पर्वाचा असत झाला . एवढे वर्ष लोकांपर्यंत महत्वाचे संदेश तातडीने पोहोचवणारे तारयंत्र आता कुठल्यातरी संग्रहालयात खितपत पडतील , खरच मग अशा जागी जावून त्या जुन्या आठवणी उजळ करणार्याचे आयुष्य दीर्घ असो . तार मला ठावूक पण नाही मी जन्मलो तेव्हा अर्थातच नवे आर्थिक धोरण ठरवले गेले , तोपर्यंत अनेक संदेशावाहांची साधने उदयास आलेली म्हणून माझा प्रचार तारेने कधीच झाला नाही . पण अनेक अशी माणसे लक्षात आहे (मनात होती , आता कुठे गेली कुणास ठावूक) जी खूप भावूक होती या तारांबद्दल ज्या कधी झटका देत , कधी उल्हास . का असे होते न ? आयुष्यात काही नाव येत अन एकदिवस ते निघून जाते उरते फक्त तरळणारे सोने , आसवरुपी सोने ......मोठी खंत यापलीकडे मग आपण वेगळे असे काहीच करू शकत नाही . निसर्ग नियामापुढे तुकावेच लागते .
आता अजूनही वेगळी कोणती शब्द्साखळीने वाचणार्याला जखडून टाकू ? हा विचार मनात टिकटिक करतोय , “टीक टीक वाजते डोक्यात ,धडधड वाढते ठोक्यात “ माझे आवडते गाणे , आवडत्या दुनियादारी या सिनेमातले ....इतके ते डोक्यात भिनलेय ना कि बस्स ,कधीही मी ते गुन् गुणत असतो ,अगदी ताल ,चाल ,लय सूर , सर्व सर्व सांभाळून . एकदा तर मी असेच कुणा मैत्रिणीस सांगितले ,’हे गाणे याचा खरा अर्थ ठावूक आहे का तुला ? ती म्हटली हे एक प्रेमगीत आहे रे . पण तुझ्याकडे नक्कीच काहीतरी अफलातून ,मसालेदार असे गाण्याचे वर्णन असेल यात तिळमात्र शंका नाही , विशू (माझे प्रेमाचे नाव ) ‘मी म्हटले ,यस , यु आर राईट , बघ ंह बिचारी कवियत्री ती ज्या गोष्टीला घाबरते , जिला पाहून तिला दारारून घाम फुटतो त्याचे वर्णन अतिशय निराळ्या शब्दात इथे केलंय . तिचा चेहराच पडला , अचंबा वगेरे तिला वाटले ; नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने (तिला तो दिसला कि बिपी हाय होतो , मग घाम हा फुटणारच ) ती जरी विचार त्याचा करू लागली कि तिला टेन्शन येत आणि मग (सोचू तुम्हे पल भर भी बरसे सावन जोमाने ) हे सर्व ऐकून , तिला हास्याचा पेव फुटला , हाहाहाहा ए गप्प रे !!!!!! बस्स बॉस किती मधाळ हसते ती , माझा काळीज खल्लास करते , मग मी हि ती हसावी म्हणून हरतर्हेने ,खेळ खेळत असतो ....हसवत असतो . ती माझी फक्त मैत्रीण आहे , असे तिचे मत आहे , मला ती जरा आणखीन जवळची वाटते , पण ती याला खोड घालते , मी मात्र जे आहे ते स्पष्ट करत राहतो ..............आपल्याला खोटे बोलून दुनियादारी नाही करता येत ........ असंच आहे माझ जरा वेगळं वेगळं .
अरे हे कुठे हरवून गेलो मी . लिहिताना सुरुवात काय होती , आणि आता वळण कुठले लागले , भलतंच काहीतरी आहे , नाही !!!!!!!!! माझा लिहूया काही हा लेख .
तरीही वाटतेय तोपर्यंत लिहित जाणार आहे मी कदाचित आता थोडसंच .................
हो आता हा लेख शेवटपर्यंत न्यायचा आहे . पण शेवट म्हणजे खरा शेवट नसतो . सुरवातीपासूनचा आढावा घेवून नव्या सुरवातीची तजवीज करून घेतलेला एक पॉज म्हणजे कोणत्याही गोष्टीचा (अपवाद मृत्यु ) शेवट .
माझ्याकरिता शेवट हा नेहमी आलापाप्रमाणे असतो , सुरेल अन अद्भुत अनुभती देणारा . मन प्रसन्न ,चित्त शांत करणारा . भावपूर्ण असा , मलाच कळेना मी असा का आहे ते , खूप भाविवश असा ,मला का कुणाशी फटकळ वागणे जमत (स्वतःहून) का , मी कुणी आपला शोधत असतो नि का मला प्रत्येकालाच आपलंस बनवायचे असते , हो हेच ते कारण ज्यामुळे मनात माणसांची गर्दी गोळा होते आणि मला भरपूर असा त्रास सहन करावा लागतो ....... हो , अरेच्चा कमाल झाली रे ! या लेखान्प्रवासात सोबती म्हणून साथ देणारा एक प्रश्न त्याचे उत्तर मला सापडले .... का माझ्या मनात माणसे गोळा झालीत , कारण माझा स्वभाव असेल ,भावनिक स्वभाव या सगळ्या गोष्टींला कारणीभूत ठरतोय , पण याला औषध आहे का कुठल्याही शास्त्रज्ञ वा डॉक्टर कडे असेल तर मला प्लीज सांगा , कारण फक्त सौमित्रच नाही तर कधी माझाही फोटो काढलात न तर त्यात लाटांच येतील .................माणसांच्या ,त्यांच्या सुख् दुखांच्या ........................................................................................
समाप्त
लेखक : विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY