Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

माझ्या स्वप्नात

 

माझ्या स्वप्नात
संपूर्ण वातवरणात रोमांच भरलेला
त्यातला एक गुलाबी थेंब
माझ्यात येवून सांडला
मी तुझ्या जवळ आलो
आणि चुमले तुला
तू हडबडली ,गडबडली आणि बडबडली
आणि मग
गाजरांच्या कुरणात एकटा मुळा किंवा
वाघांच्या अरण्यात बिचारं कोकरू
सापडावे तसं
वखवखलेल्या नजरांमध्ये , एकटी माझीच
निरागस नजर दिसू लागली .

 

 

मला एका खोलीत घर्साटात नेलं
तुला तिकडे रडताना पहिली
मला कळेच ना , तू जरा विचित्र अन वेगळी , वाटली
बघता , बघता एक माणूस कि दैत्य
धावून आला
त्याच्या हातात धारदार कात्री होती
शिव्यांच्या देत प्रसाद त्याने
केसांची लट कापुनी टाकली
छाटता छाटता ,लक्ष गेले
पहिले तर तळहात रक्ताळलेला .....
भळाभळा रक्त वाहत लागलेले
अरे हे काय केलंस तू
जीव काकुळतीला मी विचारिले
चूप्प !!! त्याने करड्या नजरेनेच दटावले .
मला वाटले आपले आयुष्य ,
अंधारले , नि आज संपले .

 

 

रडत , रडत तिकडून तू आलीस
कदाचित मी आळवलेला गळा ऐकून ?
आणि सावरताना तू जरासी
कोसळून गेली

 

 

मग पुन्हा अंधार वाढू लागला , आपल्या भोवती
तू हळूच शिरली मिठीमध्ये ,
मन तुझेमाझे सैर भैर झाले
पुन्हा ओठ ओठांशी भिडले अन ,
प्रेम त्या स्पर्शात कुजबुजले
मला वाटले आपले आयुष्य ,अंधारले आणि उजळून हि आले
तुझ्या रडण्याचे ,त्याच्या दटवण्याचे , उत्तर मिळाले
आयुष्य मिलनाने अनपेक्षित , सोन्याने उजळले
आज माझ्या स्वप्नात
असेच काहीसे घडले

 

 

विशू

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ