Vishal Lonari
मला कळतंच नाही
कुठला समुद्र खरा
खारदांङ्याचा तुझ्या
घरासमोरचा
तुझ्या जीवनाचा अविभाज्य
असा घटक
तुझ्या कवितांतून ओतप्रोत
वाहतो ,मनात कधी
उधाण आणतो तो समुद्र
कधी गुलजार ,तर कधी
सुमित्रा लाटांतून गातो
तो समुद्र
या शब्दांत साठवला
गेला आहे 'समुद्र' ?
खरंतर आहे तुच एक समुद्र
अनेक नव्या समुद्रांना
भरतीची प्रेरणा देणारा
चंद्राची ओढ त्याला . . .
कधीच नव्हती , तो तर
अतुर असायचा . . .
किनार्याला भेटायला
कुठला समुद्र खरा
तूच एक समुद्र "सौमित्र"
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY