माणसांच माणसांशी
जाणिवांचे देणघेणं असतं
त्याला म्हणतात पोक
तुम्ही कनेक्ट होतात ,कुणाशीतरी नी
एका अनाहूत वेळी कळतं तुमचं त्यांना विसरणं . . . . . .
हे कळवुन देण्यांच आँप्शन असतं पोक
पोक म्हणजे आठवण काढणं ,
पोक म्हणजे चिङवणं
तू जा ,किती ही दूरवर
तुझी वाट पाहत आहे
असं कुठल्याही नात्यातल्या व्यक्तीला
शब्द ,शब्द आणि शब्दांविना फेसबुकवर सांगण ,म्हणजे पोक
अनेकदा साँरी म्हणणं पण मांङतं पोक
कधी ,कधी भांङणातही चालतं पोक
रुसवे -फुगवे विसरवतं
जवळ आणण्यांच काम करतं पोक
शेवटी ,पुन्हा एकदा
माणसांच माणसांशी
जिव्हाळ्याचे देणघेणं
करुन देतं ,
तेच असतं पोक
तुम्ही शेवटंच पोक कधी ,कोणाला केलं ?
विशू
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY