Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

मी अजूनी विरह माझा जाळताना

 

मी अजूनी विरह माझा जाळताना
तू कधी बहरायला , सुरवात केली

 

वाळलेल्या पानांवरी गझल लिहितो ,
तू कधी कोरी वही टंकीत केली

 

मोकळे बोलून कधीचा ,अंतरीचे
तू वरवरच बोलण्या , सुरवात केली

 

चूक केली भाळण्याची हाय मोठी
का ? अशी जादू सये ह्रद्यात केली

 

वेङ मन नी नयन आसू ,गाळताना
तू धन्यता नीर सरि पुसण्यात केली

 

ना पुरेशी भेट झाली , या शब्दांशी
तू कवी संबोधण्या सुरवात केली

 

 

विशू

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ