मी भारावून गेलोय खरतरं...
सुचत नाहीये कसे आभार मानू
या तुमच्या प्रेमाचे , आपुलकी अन संगतीचे
एक पामर मी , कसे पांग फेडू .......
शब्दांसाठी तुमच्या ,
शब्द उपलब्ध नाही ..............
डोळ्यात आसवे आहेत ,
मात्र ओठात भाषा नाही .......
बेतलेल्या या संकटाला
कसा मी परतवून लावू
सांगा ना , सांगा ना
कसे आभार मानू..............
उगाच कधी एकटा मी कोंडल्या वातावरणात
वावरत असताना ,
उगाच मनात विचार कसे हो येतात ?
अचानक मग ते असे
मनाला स्पर्शून का जातात ,
का मला मग तेच विचार आवडू लागतात ,
विचारांचे चक्र माझ्या
त्या विचाराभोवातीच का बरे
फिरू लागतात ..........................
डोक्यात विचार आहेत
पण ओठात भाषा नाही
जिव्हारी घाव लागला
त्याला दावा कोणता लावू
सांगा ना , सांगा ना
कसे आभार मानू
कसा काय मग आपोआप
खाडकन मी जागा होतो
बराचवेळ गाढ झोपेत घालवून
महत्वाचे काही , करायचे
राहुन गेले असावे असे वाटून
कसा काय मी कावराबावरा होतोय ....
कंठात दाटला ,त्राण आहे
मात्र ओठात भाषा नाही
भितिला दूर कशी सारू
सांगा ना , सांगा ना
कसे मी आभार मानू ....
मी भारावून गेलो ,
पुन्हा अस्थिर आहे झालो
घाबरून जात माझ्याच वर
मी भारी होऊ लागलो ...
भरकटलेल्या या क्षणाने
आयुष्य भरकटत चालल्याप्रमाणे
वादळात मी घोंघावत राहू
या जगाच्या
कि मुकाट सारे विसरून
तेच निरस जुने आयुष्य
पुन्हा जगायला लागू ,
नवा बनू कि
जुनाटच राहू
शीरांत , नि रक्तात उसळ आहे
मात्र ओठात भाषा नाही
आता या प्रश्नांचे उत्तर
देईल मन रावू ,
कळतच नाही
मी भारावून गेलोय
सांगा ना , सांगा ना
कसे मी आभार मानू
कवी : विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY